🕯️ जिथे बहुतांश लोक संपवतात, तिथून काही जण सुरू करतात…
कधी इतकी वाईट परिस्थिती येते की घरात अन्न नसतं, लाईट बिल थकलेलं असतं, मोबाईलमध्ये रिचार्ज नसतो, आणि स्वतःचा आवाज ऐकूनही रडावंसं वाटतं.त्या क्षणी अनेकांच्या डोळ्यासमोर एकच चित्र उभं राहतं – छतावरचा पंखा.पण…काही माणसं त्या पंख्याकडे पाहून शेवटचा नाही, नवा सुरुवातीचा विचार करतात.”हे राहिलं तरी काय उपयोग? विकू या… निदान चपाती तर खायला मिळेल.”–
💔 लटकायच नव्हतं, जगायचं होतं!
हा माणूस हरलेला नाही.हा माणूस
थोडा थकलेला आहे, पण मोडलेला नाही.ज्यावेळी आत्महत्येचा विचार मनात येतो, तेव्हा तो विचार दूर सारतो. कारण त्याला माहित आहे
“मी गेलो, तर माझ्या पाठच्या लोकांचं काय?” “माझ्या आईने मला पोटात ९ महिने ठेवून जन्म दिला, मी असं सोडून जाऊ?”
त्याऐवजी तो एक पंखा विकतो, जुना फोन विकतो, जुना टीव्ही विकतो… पण मनगटातलं बळ विकत नाही!—
🛠️ जगण्यासाठी वाट शोधणारा माणू
तो पंखा विकतो म्हणजे तो हार मानतो का? नाही!
तो *शरीर विकत नाही, आत्मा विकत नाही, फक्त वस्तू विकतो, जेणेकरून उद्याचं सुर्य उगवताना तो म्हणू शकेल –”मी अजून लढतोय!
“हा माणूस रडत नाही, तो डोळ्यांतून एक स्वप्न पुसून पुन्हा नवीन स्वप्न उभं करतो.
👨👩👦 कारण त्याला कुणासाठी तरी जगायचं आहे…....
..त्याचं बाळ उपाशी झोपू नये म्हणून…
आईच्या चेहऱ्यावरचा काळजीचा एकही थेंब कमी करण्यासाठी…
बायकोने म्हटलं, “तूच आहेस माझा आधार…” यावर खरंच उतरावं म्हणून…
हा माणूस जगतोय. जगतोय म्हणजे फक्त श्वास नाही घेत,
प्रत्येक क्षणाला जगण्यासाठी स्वतःशी युद्ध करत आहे
✨ #बचेंगे तो और लड़ेंगेही एक ओळ नाही.ही एका तुटलेल्या मनाची शपथ आहे
.”माझं आयुष्य असं संपवायचं नाही.मी वाचलो, तरच मी काहीतरी मोठं करू शकेन.माझं अस्तित्वच माझं सर्वात मोठं शस्त्र आहे.”तुम्ही जिंकलात का नाही, हे नंतर पाहावं.. पण तुम्ही जगताय का? हा सर्वात मोठा विजय आहे.
📢 जर तू असा माणूस आहेस…
…जो रोज जगायचा निर्णय घेतो.
..जो लटकण्यापेक्षा पंखा विकतो..
.जो शेवट नाही, सुरुवात शोधतो..
.तर तू माझ्यासाठी Hero आहेस.
📝 शेवटचा विचार – तोडू नकोस, तु उभा राहा!
“स्वतःची किंमत एकदा पडली तर, ती मोजायला सगळं जग तयार असतं…
पण तू उभा राहिलास, तर जग स्वतःला कमी समजू लागेल!
”तू हे वाचतोस म्हणजे…..
”तू अजून लढतोस
म्हणून जग अजून तुझी वाट बघतंय.म्हणूनच – “बचेंगे तो और लड़ेंग